
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून नेमकं काय साध्य झालं ? विद्यार्थ्यांच्या मागण्यांपेक्षा राजकीय नेत्यांची प्रसिद्धीच जास्त झाली का ? भाजप आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी उपस्थित केलेल्या सवालामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
आमदार पाचपुते यांच्या आरोपानुसार, ३० सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी चर्चा करून बहुतांश मागण्या मान्य केल्या होत्या.
मात्र, एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी मुख्यमंत्र्यांच्या थेट अधिकारक्षेत्रात येत नसतानाही आंदोलन सुरू ठेवण्याचा आग्रह धरण्यात आला, असा दावा त्यांनी केला.
या आंदोलनात राजकीय नेते, कलाकार आणि प्रभावशाली व्यक्तींना बोलावून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही पाचपुते यांनी केला. आंदोलनाचा फायदा विद्यार्थ्यांना झाला की रोहित पवारांच्या राजकीय प्रतिमेला ? हा सवाल उपस्थित करत पाचपुते यांनी रोहित पवारांना उत्तर देण्याचं आव्हान दिलं आहे.





