Latest

मोठी बातमी : अहिल्यानगरमध्ये ‘या’ कुख्यात टोळीवर पोलिसांचा मोठा प्रहार ! थेट संघटित गुन्हेगारीचे कलम

६ ऑक्टोबर २०२६… रात्रीची वेळ… तपोवन रोडवरील ढवण वस्तीमधील शिवाय पान शॉपसमोर काही जणांचे भांडण सुरू होते. फिर्यादीने त्यांना भांडण करू नका, असे सांगून तेथून पाठवले. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून टोळीने फिर्यादी आणि त्याच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याचा आरोप आहे.

लोखंडी कोयता, रॉड आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करत पानटपरीच्या गल्ल्यातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची तक्रार दाखल झाली.

या प्रकरणात टोळीप्रमुख ताहेर मुन्ना शेख, यश भगवान बुट्टे, प्रतीक नवनाथ तागड, आदेश थोरात, आदित्य लक्ष्मीकांत जाचक, तुषार लहानु पानसरे, विकास अशोक नन्नवरे, यशराज आव्हाड आणि साहिल कनगरे यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

या टोळीवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही सुधारणा होत नसल्याने तोफखाना पोलिसांनी संघटित गुन्हेगारीविरोधातील कलम १११ अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला. अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी त्याला मंजुरी दिली.

ही कारवाई पोलिस उपअधीक्षक दिलीप टिपरसे, पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य, सहायक पोलिस निरीक्षक कल्पना चव्हाण आणि पोलिस अंमलदार काळे व हेमंत झिने यांच्या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button