
पैशांचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली एका महिलेला शरीरसंबंध ठेवण्याचं आमिष दाखवल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात उघडकीस आला आहे.
फिर्यादीनुसार, संबंधित महिला दोन ओळखीच्या महिलांसोबत साडी बघायला गेली होती. तिथे आधीपासूनच चार जण होतेमहिलेला सांगण्यात आलं की, पुढील पंधरवड्यात अघोरी पूजा केली जाणार आहे. या पूजेसाठी तिला रिंगणात बसवलं जाईल.
पूजा करताना स्पर्श होईल, पण तो जाणवणार नाही आणि तिच्यात अदृश्य शक्ती येईल, असं भासवण्यात आलं. यानंतर समोर बसलेल्या पाच जणांपैकी एकाची निवड करण्यास सांगितलं. त्याच्यासोबत शरीरसंबंध ठेवायचे आणि जितका जास्त वेळ संबंध ठेवशील, तितका जास्त पैशांचा पाऊस पडेल, असं आमिष दाखवल्याचा आरोप आहे.
मात्र, महिलेने प्रसंगावधान राखत तिथून सुटका करून घेतली. पतीला सर्व प्रकार सांगितल्यानंतर तिने राजूर पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी नाशिकच्या भोंदूसह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तिघांना अटक झाल्याची माहिती आहे.





