Latest

सर्वसामान्यांना पुन्हा मोठा धक्का… साखरेच्या दरात आठवडाभरात इतकी वाढ ! दर आणखी वाढणार की ग्राहकांना दिलासा मिळणार ?

मंडळी, देशांतर्गत बाजारात साखरेची मागणी वाढली असून, आवक मात्र तुलनेने कमी आहे. त्यामुळे साखरेचे दर क्विंटलमागे ४७०० ते ४८०० रुपयांवरून थेट ५३०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे, साखरेच्या एस ३० ग्रेडचा दरही क्विंटलला ५३०० रुपयांवर गेला आहे.

या दरवाढीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यासाठी १६ लाख मेट्रिक टन साखरेचा कोटा खुला केला आहे. यामध्ये साखर कारखान्यांकडील १४ लाख टन आणि आयात केलेल्या दोन लाख टन साखरेचा समावेश आहे.

नवरात्र, दसरा आणि दिवाळीमुळे साखरेची मागणी वाढली आहे. गुजरात, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधूनही महाराष्ट्रातील साखरेला मागणी आहे. मात्र, ऊस गाळपाला वेग न आल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आता नव्या कोट्यातील निविदांचे दर साखरेच्या बाजाराची पुढील दिशा ठरवणार आहेत. पण साखरेची ही तेजी कायम राहणार की दर कमी होणार ? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button