Latest

सरकारचा मोठा निर्णय… हॉस्पिटल्सच्या मनमानी बिलिंगला लगाम लागणार ? सरकारच्या ‘त्या’ निर्णयाची देशभर चर्चा

रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर प्रत्यक्ष खर्च किती होईल, याची चिंता अनेकांना सतावत असते. कधी कधी उपचारानंतर हातात येणारे बिल पाहून रुग्णांचे नातेवाईकही हैराण होतात. मात्र, आता अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना रुग्णालयांमध्ये उपचारांचे दर दर्शनी भागात लावण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी यासंदर्भात राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे.

विशेष म्हणजे, उपचारांचे दर स्थानिक भाषा आणि इंग्रजीमध्ये स्पष्टपणे प्रदर्शित करणे आवश्यक आहे. त्यामुळे रुग्णांना तपासण्या, विविध उपचार आणि शस्त्रक्रियांचा संभाव्य खर्च समजण्यास मदत होईल. तसेच अवाजवी बिलांवरून होणारे वाद कमी होण्याची अपेक्षा आहे.

परदेशातून भारतात उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे पॅकेज दरही जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे रुग्णालयांच्या बिलिंगमध्ये पारदर्शकता वाढणार का? आता रुग्णांना उपचारांच्या खर्चाची माहिती मिळवणे अधिक सोपे होणार आहे!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button