Explained

MPSC आंदोलन की PR स्टंट? पाचपुतेंच्या ‘याँर्कर’वर रोहितदादा ‘क्लिनबोल्ड’..?

पुण्यात तब्बल १२ दिवस चाललेलं एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं रणकंदन अखेर संपलं. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी सलग ४ वेळा सकारात्मक चर्चा करून विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावले. पण, हे आंदोलन संपताच महाराष्ट्राच्या राजकारणात एक अतिशय खळबळजनक कलगीतुरा रंगलाय! भाजपचे आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर अतिशय सडकून आणि थेट शब्दांत टीका केलीय. ‘हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी होतं की रोहित पवारांचं राजकीय लॉन्चिंग पॅड होतं?’, असा थेट सवाल पाचपुते यांनी विचारलाय. एवढंच नाही, तर पक्षाची झालेली वाताहत लपवण्यासाठी आणि स्वतःची प्रतिमा निर्मिती करण्यासाठी रोहित पवारांनी विद्यार्थ्यांचे १२ दिवस कसे वाया घालवले, याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठाच आ. पाचपुतेंनी समोर आणलाय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रोहित पवारांच्या आतापर्यंतच्या आंदोलनाचा इतिहास, शरद पवार पक्षाची झालेली राजकीय वाताहत आणि पाचपुते यांनी लावलेला टोला!

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी उपस्थित केलेला सर्वात पहिला आणि धक्कादायक मुद्दा म्हणजे – ‘संविधानिक मर्यादांचे भान का ठेवले नाही?’

एमपीएससीच्या विषयावर आंदोलन सुरु झाल्यानंतर, ३० सप्टेंबर रोजीच मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी सविस्तर बैठक घेऊन परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणणे आणि गैरप्रकारांची चौकशी करण्याच्या बहुतांश प्रमुख मागण्या मान्य केल्या होत्या. महायुती सरकार विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पहिल्या दिवसापासून सकारात्मक होते. तरीही, रोहित पवार एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याचा हट्ट धरून बसले आणि आंदोलन मागे घेऊ दिले नाही. इथेच आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी रोहित पवारांच्या अज्ञानावर आणि राजकीय हट्टावर बोट ठेवलंय. पाचपुते यांनी स्पष्ट केलंय की, एमपीएससी ही भारतीय संविधानाच्या कलम ३१७ नुसार स्थापन झालेली एक स्वायत्त आणि घटनात्मक संस्था आहे. कोणत्याही राज्याच्या सरकारच्या किंवा मुख्यमंत्र्यांच्या हातात एमपीएससी अध्यक्षांना थेट एका फटक्यात पदावरून हटवण्याचे किंवा त्यांचा राजीनामा घेण्याचे अधिकार नसतात. त्यासाठी राष्ट्रपतींची आणि सर्वोच्च न्यायालयाची एक ठरलेली कायदेशीर प्रक्रिया असते.

जी गोष्ट कायदेशीररित्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातच नाही, त्याच गोष्टीचा हट्ट धरून रोहित पवारांनी हा संघर्ष १२ दिवस का ताणला? काय रोहित पवारांना संविधानाचे हे साधे नियम माहीत नव्हते? की माहीत असूनही केवळ स्वतःच्या राजकीय हट्टापायी त्यांनी विद्यार्थ्यांचे मौल्यवान १२ दिवस आणि त्यांचे प्रचंड मानसिक हाल केले? या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी आता रोहित पवार घेणार का? आमदार पाचपुते यांनी घेतलेला हे आक्षेप अत्यंत कायदेशीर आणि विचार करायला लावणारे आहेत.

आता आपण येऊया आमदार पाचपुते यांच्या दुसऱ्या मोठ्या आरोपावर, जो रोहित पवारांच्या आतापर्यंतच्या आंदोलनांच्या स्वरूपावर प्रकाश टाकतो. रोहित पवारांचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर, ते अशा प्रत्येक संवेदनशील विषयात उडी घेतात जिथे त्यांना सोशल मीडिया मायलेज मिळू शकते. यापूर्वीही त्यांनी घेतलेली आंदोलने किंवा काढलेल्या पदयात्रा या मूळ प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वतःचे ब्रँडिंग करण्यासाठीच जास्त वापरल्या गेल्या, असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आलाय. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अगदी अचूक शब्दांत या स्टंटबाजीवर प्रहार केलाय. पाचपुते म्हणाले की, ‘हे आंदोलन विद्यार्थ्यांचे राहिलेच नव्हते, तर ते रोहित पवारांच्या वैयक्तिक लॉन्चिंगचा इव्हेंट बनले होते.’ आंदोलनाच्या मंचावर शेवटी कवी, कलाकार आणि राजकीय नेते यांची गर्दी झाली होती. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर चर्चा होण्याऐवजी रोहित पवार रात्री रस्त्यावर कसे झोपले, त्यांनी काय खाल्लं, त्यांचे फेसबुक लाईव्ह आणि त्यांचे पीआर व्हिडिओ कसे बनले, यावरच जास्त भर दिला गेला.
पाचपुते यांनी एक अतिशय मार्मिक उदाहरण दिलंय. ते म्हणाले की, ‘एखाद्या लग्नात किंवा कार्यक्रमात जशी एखादी सुंदर मुलगी आली की नापास होणारी मुले देखील तिच्या मागे मागे फिरतात आणि स्वतःचे नुकसान करून घेतात, तसंच काहीसं या आंदोलनात झालं.’ राजकीय नेते येतात, आंदोलनाचा चेहरा बनतात, स्वतःची प्रसिद्धी करून घेतात आणि पुढे निघून जातात. पण शेवटी नुकसान कोणाचं होतं? तर त्या प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं! रोहित पवारांनी विद्यार्थ्यांच्या या भावनांचा वापर केवळ स्वतःच्या ‘युवा नेता’ या प्रतिमेच्या लॉन्चिंगसाठी केला, हे पाचपुते यांनी समोर आणलं आहे.

आता आपण या संपूर्ण प्रकरणाच्या सर्वात महत्त्वाच्या राजकीय पैलूकडे वळूया तो म्हणजे शरद पवार पक्षाची झालेली वाताहत!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील मोठा गट सत्तेत सामील झाला. यामुळे शरद पवार यांच्या पक्षाची मोठी राजकीय वाताहत झाली आहे. पक्षाकडे ग्रामीण भागात आणि विशेषतः सुशिक्षित तरुणांमध्ये पकड निर्माण करू शकेल अशा आक्रमक नेतृत्वाची मोठी कमतरता निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी आणि तरुणांना आकर्षित करण्यासाठी त्यांना एका मोठ्या राजकीय इव्हेंटची गरज होती. आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी नेमका याच दुखत्या मुद्यावर बोट ठेवलंय. पाचपुते यांच्या मते, रोहित पवार हे स्वतःच्या पक्षाची झालेली ही राजकीय वाताहत आणि नैराश्य लपवण्यासाठीच अशा आंदोलनांचा आसरा घेत आहेत. पक्षात स्वतःचे स्थान सुप्रिया सुळे किंवा इतर नेत्यांपेक्षा वरचे सिद्ध करण्यासाठी आणि आपणच पक्षाचे खरे वारसदार आहोत हे दाखवण्यासाठी रोहित पवारांना अशा स्टंट्सची गरज पडत आहे. पण विचार करा, पक्षाची वाताहत लपवण्यासाठी तुम्ही विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा बळी देणार का? महाविकास आघाडीचे सरकार जेव्हा महाराष्ट्रात अडीच वर्षे सत्तेत होते, तेव्हा स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटले, आरोग्य भरतीचा घोळ झाला, महापोर्टलवरून हजारो तरुणांचे नुकसान झाले. तेव्हा सत्ताधारी आमदार म्हणून रोहित पवार शांत का होते? तेव्हा त्यांनी आपल्याच सरकारविरोधी आंदोलन का केले नाही? तेव्हा पक्षाची सत्ता होती, त्यामुळे ते गप्प होते. आज पक्षाची वाताहत झाली आहे, पक्ष अडचणीत आहे, म्हणून त्यांना विद्यार्थ्यांचा पुळका आला आहे. हा दुटप्पीपणा आमदार पाचपुते यांनी समोर आणला आहे.

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या म्हणण्यांनुसार महायुती सरकारची भूमिका ही विद्यार्थ्यांच्या हिताची राहिली आहे. सरकारला आंदोलकांचे प्रश्न सोडवायचे होते, राजकारण करायचे नव्हते. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी प्रतिनिधींना बोलावून त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. पाचपुते यांनी स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांचे प्रश्न हे चर्चेतून सुटू शकतात, रस्त्यावर राजकीय तमाशा करून नाही. महायुती सरकारने घेतलेले निर्णय हे नियमांना आणि संविधानाला धरून आहेत. विरोधक कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असले, तरी सुशिक्षित बेरोजगार तरुण हे सुजाण आहेत. त्यांना समजतं की कोण केवळ कॅमेऱ्यासमोर आंदोलनाचे नाटक करत आहे आणि कोण प्रत्यक्षात प्रशासकीय पातळीवर काम करून प्रश्न सोडवत आहे. आमदार पाचपुते यांनी रोहित पवारांना आरसा दाखवण्याचे काम केले आहे की, राजकारण करायचे असेल तर ते निवडणुकीच्या मैदानात करा, अभ्यास करणाऱ्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळून स्वतःचे राजकीय लाँचिंग करू नका!

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी रोहित पवारांवर आणि त्यांच्या आंदोलनांवर केलेले हे भाष्य सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. संविधानाच्या कलम ३१७ चे ज्ञान नसताना आंदोलनाचा हट्ट धरणे, पक्षाची झालेली राजकीय वाताहत लपवण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर करणे आणि स्वतःच्या लाँचिंगसाठी १२ दिवस संघर्ष ताणून धरणे… या सगळ्या गोष्टी रोहित पवारांच्या राजकीय अपरिपक्वतेचा पुरावा आहेत, हेच पाचपुते यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button