Latest

श्रीगोंद्यात गोळीबार आणि एकाची हत्या झाल्याची माहिती मिळाली पोलीस धावले… पण घटनास्थळी पोहोचताच भलतंच सत्य समोर ! नेमकं काय घडलं?

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील कोसेगव्हाण येथील मोहन विश्वनाथ शिंदे याने डायल ११२ या आपत्कालीन हेल्पलाइनवर फोन केला.

एका व्यक्तीचा गोळी मारून खून झाल्याची आणि घटनास्थळी अजूनही प्रकार सुरू असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच पोलीस नियंत्रण कक्षाने तातडीने संबंधित पोलीस ठाण्याचे वाहन घटनास्थळी रवाना केले.

मात्र, घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना वेगळेच वास्तव दिसले. तिथे ना खुनाची घटना घडली होती, ना त्याने दिलेली माहिती खरी ठरली! अखेर पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी मोहन शिंदेविरुद्ध श्रीगोंदे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी खोटे कॉल करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. लक्षात ठेवा, डायल ११२ ही करमणुकीसाठी नाही, तर संकटातील नागरिकांच्या मदतीसाठी आहे. खोट्या कॉलमुळे गरजूंच्या मदतीला उशीर होऊ शकतो!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button