Latest

धीरज परदेशी, दीपक वाघस्कर आणि रवींद्र चव्हाण हत्या प्रकरणात मोठे अपडेट…आमदार संग्राम जगताप यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, नेमकं कारण काय ?

अहिल्यानगर शहरातील तीन खून प्रकरणांना आता महत्त्वाचं वळण मिळण्याची शक्यता आहे ! या तिन्ही प्रकरणांचा तपास पारदर्शक व्हावा आणि पीडित कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

धीरज परदेशी, दीपक वाघस्कर आणि रवींद्र चव्हाण यांच्या हत्या प्रकरणांबाबत जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. या तिन्ही प्रकरणांसाठी अनुभवी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

धीरज परदेशी हत्याकांडात न्यायालयीन प्रक्रिया प्रभावीपणे पार पडावी, तर दीपक वाघस्कर यांच्या मृत्यूमागील सत्य समोर यावं, यासाठी विशेष तपास पथक म्हणजेच एसआयटी स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भिंगारमधील गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराचीही सखोल चौकशी करण्याची मागणी जगताप यांनी केली. या घटनेत दीपक वाघस्कर यांच्या मृत्यूबाबत नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

तिन्ही प्रकरणांमध्ये दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी आणि पीडित कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालावं, अशी भूमिका संग्राम जगताप यांनी मांडली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button