Latest

संगमनेरकरांसाठी मोठी बातमी ! एमआयडीसी कुठे विकसित होणार ? आमदार अमोल खताळांनी दिलं मोठं अपडेट !

संगमनेरच्या बेरोजगार तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तालुक्यातील प्रस्तावित एमआयडीसी कौठे मलकापूर येथेच होणार, असा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे संगमनेरच्या औद्योगिक विकासाच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत.

सोमवारी, १२ ऑक्टोबर रोजी आमदार अमोल खताळ यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत प्रस्तावित जागेची पाहणी केली. यावेळी महामंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शंकर बर्गे, प्रादेशिक अधिकारी गणेश राठोड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

संगमनेरमध्ये एमआयडीसी उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केल्याचे खताळ यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, प्रस्तावित एमआयडीसीसाठी पाणी राखीव ठेवण्याचा शब्दही जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आता या एमआयडीसीमुळे संगमनेरमध्ये किती रोजगार निर्माण होणार, याकडे तरुणांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button