२३ ऑक्टोबर २०२६… दुपारची साडेचारची वेळ. अहिल्यानगरचं सावेडी उपनगर नेहमीप्रमाणे गजबजलेलं होतं. लोक आपल्या कामात व्यस्त होते. पण अचानक… एका फ्लॅटमधून गोळीबाराचा आवाज येतो! एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडते… आणि संपूर्ण शहरात खळबळ उडते!
पण हा थरार इथंच संपत नाही. या घटनेनंतर अवघ्या काही मिनिटांत, शहरालगतच्या कापूरवाडी तलावाजवळ आणखी एक गोळी झाडली जाते… आणि एका ३५ वर्षांच्या तरुणाचा मृतदेह जमिनीवर कोसळतो!
एकाच दिवशी… एकाच शहरात… एकाच बंदुकीतून दोन वेगवेगळ्या ठिकाणी गोळ्या चालविल्या जातात! काय घडलं होतं, त्या दिवशी सावेडी परिसरात? कोण होता तो तरुण? त्याने थेट मृत्यूचा खेळ का मांडला? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर हादरवून टाकणाऱ्या ‘एकतर्फी’ प्रेम प्रकरणाचा संपूर्ण थरार, त्यामागचं मानसशास्त्र आणि महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अशाच काही भयानक घटनांचा पर्दाफाश करणार आहोत.
मित्रांनो, सुरुवातीला आपण शुक्रवारी घडलेली घटना समजून घेऊ. या घटनेतील मुख्य आरोपीचं नाव होतं योगेश सोमनाथ डोंगरे. वय ३५ वर्ष. योगेश हा सावेडी उपनगरातील एका ३५ वर्षीय महिलेच्या संपर्कात होता. प्राथमिक माहितीनुसार, योगेशचं तिच्यावर एकतर्फी प्रेम होतं किंवा त्यांच्यात सलगी होती. २३ ऑक्टोबरच्या दुपारी, योगेश एका प्लॅटमध्ये त्या महिलेला भेटायला जातो. तिथे त्यांच्यात जोरदार वाद सुरू होतो. वाद इतका टोकाला जातो की योगेशच्या डोक्यात बदले की आग वाढते… तो विचार करण्याची क्षमता हरवून बसतो. अचानक तो आपल्या खिशातून एक बेकायदेशीर पिस्तूल काढतो… आणि थेट त्या महिलेवर गोळी झाडतो! गोळी लागताच ती महिला रक्ताच्या थारोळ्यात कोसळते.
आता योगेशला समजलं होतं की आपण खूप मोठी चूक केली आहे. फ्लॅटच्या आसपासच्या लोकांना गोळीबाराचा आवाज आल्यावर पकडले जाण्याच्या भीतीने तो घटनास्थळावरून पळ काढतो. तो थेट गाठतो शहराबाहेरचा कापूरवाडी तलाव परिसर. तलावाच्या शांत किनाऱ्यावर, एकांतात उभा राहून टोकाच्या नैराश्यातून तो तीच पिस्तूल स्वतःच्या डोक्याला लावतो… आणि ट्रिगर दाबतो! एक मोठा आवाज… आणि योगेश डोंगरे जागच्या जागीच संपतो.
सुदैवाने, त्या महिलेचा जीव वाचला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पण मित्रांनो, एक विचार करा… एखादा माणूस इतका टोकाचा पाऊल कसा काय उचलू शकतो? ‘ती माझी नाही तर कोणाचीच होऊ शकत नाही’ ही भावना कुठून येते? मानसशास्त्रात या मानसिकतेला काय म्हणतात? चला समजून घेऊया.
१. मर्डर-सुसाईड सिंड्रोम :
मानसशास्त्रात याला ‘मर्डर-सुसाईड’ म्हणतात. अशा घटनांमध्ये व्यक्ती इतकी आक्रमक आणि निराश झालेली असते की, तिला समोरच्या व्यक्तीचा आणि स्वतःचा जीव घेण्यात काहीच गैर वाटत नाही.
२. ओव्हर-पॉझेसिव्हनेस आणि अहंकार :
अशा लोकांमध्ये ‘अहंकार’ खूप मोठा असतो. जेव्हा त्यांना एखाद्या गोष्टीसाठी किंवा प्रेमासाठी ‘नाही’ ऐकायला मिळतं, तेव्हा त्यांचा अहंकार दुखावला जातो. त्यांना नकार पचवता येत नाही.
३. बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर किंवा सायकोपॅथी :
अनेक गुन्हेगारांमध्ये ‘बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर’ची लक्षणं असतात. हे लोक भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत. क्षणिक रागाच्या भरात हे लोक इतरांचा जीव घेतात आणि नंतर पश्चात्ताप किंवा शिक्षेच्या भीतीने स्वतःलाही संपवून टाकतात.
४. सोशल मीडिया आणि चित्रपटांचा प्रभाव:
आजकाल सिनेमांमध्ये ‘कबीर सिंग’ सारखी पात्रं किंवा एकतर्फी प्रेमात हिंसेचं उदात्तीकरण केलं जातं. ‘मी तिच्यासाठी काहीही करेन, अगदी जीव घेईन’ हा चुकीचा संदेश तरुणांच्या डोक्यात घर करतो, आणि वास्तवात ते असे गुन्हे करून बसतात.
तुम्हाला वाटेल की ही अहिल्यानगरमधील पहिलीच घटना आहे? तर नाही! महाराष्ट्रात अशा एकतर्फी प्रेमातून आणि विकृत मानसिकतेतून अनेक भयानक घटना घडल्या आहेत, ज्या आठवून आजही अंगावर काटा येतो.
१. हिंगणघाट जळीत कांड (२०२०):
फेब्रुवारी २०२० मध्ये घडलेली ही घटना विसरणं अशक्य आहे. अंकिता पिसुद्दे या तरुणीने विकेश नगराळे या तरुणाचा प्रेमप्रस्ताव नाकारला होता. याचा सूड घेण्यासाठी त्याने भररस्त्यात अंकितावर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळलं होतं. या घटनेने संपूर्ण देश पेटून उठला होता.
२. पुण्याचे सदाशिव पेठ प्रकरण (२०२३):
पुण्यात एका तरुणीने प्रेमसंबंध तोडल्यामुळे एका माथेफिरू तरुणाने भररस्त्यात तिच्यावर कोयत्याने हल्ला केला होता. सुदैवाने तिथे धाडसी तरुण मदतीला धावून आले आणि त्या तरुणीचा जीव वाचला.
३. एनसीआरबीचा रिपोर्ट :
नुकत्याच झालेल्या National Crime Records Bureau च्या अहवालानुसार, महाराष्ट्रात दरवर्षी प्रेमसंबंध, एकतर्फी प्रेम आणि कौटुंबिक वादातून जवळपास ३०० ते ४०० हत्या आणि आत्महत्येच्या घटना घडतात. यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील तरुणांची संख्या तब्बल ७०% आहे.
मित्रांनो, गुन्हेगार मरतो, किंवा त्याला जेल होते… पण यात उद्ध्वस्त होतात ती दोन निष्पाप कुटुंबं! यावर उपाय काय?
सर्वात आधी तरुणांना ‘नाही’ ऐकण्याची आणि ते पचवण्याची सवय लागली पाहिजे. प्रेम हे जबरदस्तीने होत नाही, हे समजून घेतलं पाहिजे.
जर तुमच्या ओळखीत कोणी टोकाच्या नैराश्यात असेल, किंवा कोणाच्या वागण्यात अचानक हिंस्त्र बदल दिसत असतील, तर त्वरित मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्या, त्याचं कौन्सिलिंग करा.
पालकांनी आपल्या मुलांशी संवाद वाढवला पाहिजे, जेणेकरून मुलं मनातील राग किंवा नैराश्य चुकीच्या मार्गाने बाहेर काढणार नाहीत.
अहिल्यानगरमधील योगेश डोंगरेची घटना ही आपल्या समाजासाठी एक धोक्याची घंटा आहे. तुम्हाला काय वाटतं, अशा विकृत मानसिकतेच्या घटना रोखण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत?





