
आज अहिल्यानगरच्या राजकारणातील एक ज्येष्ठ नेतृत्व हरपलं ! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर यांचं आज, २४ ऑक्टोबर रोजी निधन झालं. त्यांच्या निधनाने राजकीय आणि सहकार क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
भानुदास कोतकर यांना हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७४ वर्षांचे होते.
दरम्यान, भानुदास कोतकर यांच्यावर आज, शनिवारी २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अहिल्यानगरमधील कृषी उत्पन्न बाजार समिती रोडवरील कोतकर निवासमागे, केडगाव येथे हा अंत्यविधी पार पडणार आहे.
भानुदास कोतकर यांनी नगर पंचायत समितीचे सभापती, बाजार समितीचे सभापती आणि काँग्रेसचे विविध पदाधिकारी म्हणून काम पाहिलं होत. त्यांच्या जाण्याने जिल्ह्याच्या राजकीय आणि कृषी क्षेत्रातील एका ज्येष्ठ व्यक्तिमत्त्वाची कारकीर्द संपुष्टात आली आहे.





