Latest

अहिल्यानगरमध्ये ७० लाखांची फसवणूक… सारडा परिवारावर गुन्हा दाखल ! नेमकं प्रकरण काय ?

अहिल्यानगरच्या सारडा गल्लीतील एका व्यावसायिक मालमत्तेच्या व्यवहारातून तब्बल ७० लाख १० हजार रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. नेमकं प्रकरण काय? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, वसीम बागवान यांना व्यवसायासाठी सारडा गल्लीतील दुकान, फर्निचर आणि इमारत खरेदी करायची होती. यासाठी न्यू ट्रेड इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक रवींद्र पुरुषोत्तम सारडा आणि हेमलता रवींद्र सारडा यांच्यासोबत ६ कोटी ८० लाख रुपयांचा व्यवहार ठरला होता.

या व्यवहारासाठी आणि बँकेचे कर्ज फेडण्याकरिता फिर्यादीने वेळोवेळी ऑनलाइन आणि रोख स्वरूपात ७० लाख १० हजार रुपये दिल्याचं तक्रारीत म्हटलं आहे.

मात्र, बँकेच्या वन टाइम सेटलमेंटसाठी आवश्यक कागदपत्रे न मिळाल्याने व्यवहार रखडल्याचा आरोप आहे. त्यानंतर साठेखताची मुदत संपल्याचे भासवून वर्तमानपत्रात जाहीर प्रगटन देण्यात आलं आणि मालमत्ता इतर दोघांना विकल्याचा आरोप करण्यात आला.

याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक समाधान सोळंके पुढील तपास करत आहेत. तुमच्या मते, अशा प्रकरणात दोषींवर काय कारवाई व्हायला हवी? कमेंट नक्की करा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button