Latest

अहिल्यानगरचे ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांचे निधन ! हृदयविकाराचा त्रास…

अहिल्यानगरमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास एकनाथ कोतकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते.

भानुदास कोतकर यांना आज सकाळी हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तातडीने अहिल्यानगर येथील आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनाच्या वृत्ताने राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्येष्ठ नेते भानुदास कोतकर यांच्या निधनामुळे अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळातून दुःख व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button