
अहिल्यानगरमध्ये ७५ वर्षीय वृद्धाच्या मालमत्तेच्या कथित बेकायदेशीर हस्तांतरणाचं प्रकरण चर्चेत आलंय. या प्रकरणात आरोपी असलेल्या महिला वकील ॲड. तेजस्वी तवले यांना न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे.
नेमकं हे प्रकरण काय आहे? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा. मंडळी तक्रारीनुसार, वृद्धाच्या मालमत्तेचं हस्तांतरण करण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार केल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इतकंच नाही, तर वृद्ध व्यक्तीला त्याच्या इच्छेविरुद्ध एका संस्थेत ठेवल्याचाही आरोप आहे. याशिवाय, वृद्धाच्या बँक खात्यातून डेबिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता.
या प्रकरणी अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. गायधनी यांच्यासमोर जामीन अर्जावर सुनावणी झाली.
२३ ऑक्टोबर २०२६ रोजी न्यायालयाने ॲड. तेजस्वी तवले यांना नियमित जामीन मंजूर केला. या प्रकरणाबाबत तुमचं मत काय? कमेंट करून नक्की सांगा.





