
पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे ! काय आहे नवीन अपडेट? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, पीएम किसानचा २४ वा हप्ता येत्या ३० ऑक्टोबर २०२६ रोजी वितरित केला जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या लाभाचे वितरण होणार आहे.
या हप्त्याअंतर्गत देशातील ९ कोटी ३४ लाखांहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण १८ हजार ६८० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली जाणार आहे. म्हणजेच पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपये मिळणार आहेत.
या योजनेतून शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण ६ हजार रुपयांची मदत तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर या योजनेजा २४ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याने शेतकऱ्यांना याचा नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. पण मंडळी, तुम्हाला पीएम किसानचा लाभ मिळतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा.





