Latest

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! कापसाला हमीभावापेक्षा १,२३३ रुपये जास्त दर ; यंदा कापसाला हायेस्ट किती भाव मिळणार ?

कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हंगामाच्या सुरुवातीलाच दिलासादायक बातमी समोर आली आहे. कापसाला सरकारी हमीभावापेक्षा जास्त दर मिळू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहेत. पण यंदा कापसाला हायेस्ट किती भाव मिळणार? जाणून घेऊया. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, नागपूर जिल्ह्यातील कुही कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाचा भाव प्रतिक्विंटल ९ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला. तर मध्य प्रदेशातील बेरडी येथे कापसाला ९ हजार १०१ रुपये दर मिळाला. २०२६-२७ हंगामासाठी केंद्र सरकारने मध्यम धाग्याच्या कापसाचा हमीभाव ८ हजार २६७ रुपये, तर लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव ८ हजार ६६७ रुपये निश्चित केला आहे.

म्हणजेच कुहीतील दर मध्यम धाग्याच्या कापसाच्या हमीभावापेक्षा तब्बल १ हजार २३३ रुपयांनी जास्त आहे. मात्र, एक गोष्ट लक्षात घ्या ! प्रत्येक शेतकऱ्याला हाच भाव मिळेल, असं नाही.

कापसाची गुणवत्ता, ओलावा, बाजारातील आवक आणि मागणी यावर दर ठरणार आहेत. आता सांगा, तुमच्या भागात कापसाला किती भाव मिळतोय? कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचं नाव आणि दर सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button