Latest

श्रीगोंद्यात चोरट्यांची हिंमत वाढली… चोरट्यांनी माजी नगरसेवकाच्या वडिलांनाच लुटलं ! नेमकं घडलं काय ?

श्रीगोंद्यात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दरम्यान काल चोरट्यांनी माजी नगरसेवकाच्या वडिलांनाच लुटलय. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24ला फॉलो नक्की करा.

मंडळी, श्रीगोंदा शहरात माजी नगरसेवक सुनील वाळके यांचे वडील भगवान वाळके यांना चोरट्यांनी लक्ष्य केलं. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी आपण पोलीस असल्याचं भासवलं आणि त्यांच्या हातातील जवळपास एक तोळ्याची सोन्याची अंगठी लंपास करून पळ काढला. ही घटना दुपारी तीनच्या सुमारास घडली.

विशेष म्हणजे, आठवडाभरात शहर परिसरात घडलेली ही दुसरी घटना आहे. याआधी औटीवाडी परिसरात शेळ्या चारणाऱ्या महिलेचं मंगळसूत्र ओरबाडण्यात आलं होतं.

दरम्यान, शहराजवळील डोंगरावर पोलिसांची पार्टी सुरू असल्याची चर्चा आहे. याचवेळी चोरी झाली आणि तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात कर्मचारी उपलब्ध नसल्याचंही सांगितलं जातंय.

मात्र, या चर्चांना अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. आता पोलीस निरीक्षक सुभाष सानप या प्रकरणात काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button