Latest

अहिल्यानगर जिल्ह्यातील ‘या’ मंदिराची जमीन दिली हॉटेलला ! नेमकं प्रकरण काय?

अहिल्यानगर जिल्ह्यातील एका मंदिराची जमीन चक्क हॉटेलला दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे ! नेमक प्रकरण काय? सगळं सांगतो आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी, शेवगाव शहरात श्रीराम मंदिर देवस्थान ट्रस्टच्या मालकीची १७३८.३२ चौरस मीटर म्हणजेच १७.१८ गुंठे मोक्याची जागा भाडेकराराने देण्यात आली. विशेष म्हणजे, यासाठी कायदेशीर टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली नसल्याचा आरोप आहे.

१४ ऑगस्ट २०२६ रोजी हा करार करण्यात आला. मात्र, भाडेकरारात थकबाकीचा आणि प्रति गुंठा मिळणाऱ्या भाड्याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचं समोर आलं आहे. इतकंच नाही, तर करारासाठी बंद पडलेल्या बँकेचा चेक दिल्याची माहितीही समोर आली आहे.

तसेच जागा भाड्याने देण्यासाठी विश्वस्त मंडळाचा अधिकृत ठराव जोडण्यात आलेला नसल्याचं वृत्त आहे. ही जागा हॉटेल व्यवसायासाठी देण्यात आल्याची माहिती आहे.

या प्रकरणी संबंधित कार्यालयाकडून खुलासा मागवण्यात आला असून, दोन्ही बाजूंची सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, असं मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात पुढे काय होणार? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button