Latest

बँक खात्यातून पैसे गेले, पण SMS आलाच नाही तर बँकेला नुकसान भरपाई द्यावी लागते का ? ग्राहक आयोगाने स्पष्टच सांगितलं

तुमच्या बँक खात्यातून अचानक पैसे गायब झाले आणि मोबाईलवर व्यवहाराचा मेसेजही आला नाही, तर काय होईल? अशाच एका प्रकरणात भारतीय स्टेट बँकेला ग्राहक आयोगाने मोठा दणका दिला आहे.

दिल्लीतील सरिता यांचं SBIच्या सीलमपूर शाखेत बचत खातं होतं. मार्च २०२० मध्ये त्यांच्या खात्यात १ लाख ३५ हजार रुपयांहून अधिक रक्कम जमा होती. मात्र, नोव्हेंबरमध्ये पैसे काढण्यासाठी त्या बँकेत गेल्या, तेव्हा खात्यातील रक्कम गायब झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

चौकशीदरम्यान मे ते जुलै २०२० या काळात वेगवेगळ्या ठिकाणांहून खात्यातून पैसे काढल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे, या व्यवहारांचे SMS अलर्ट त्यांना मिळाले नव्हते.

या प्रकरणात ग्राहक आयोगाने SBIला सेवेतील त्रुटीसाठी दोषी ठरवत १ लाख ३५ हजार ५०० रुपये ९ टक्के वार्षिक व्याजासह परत करण्याचे आदेश दिले. तसेच ४५ हजार रुपये नुकसानभरपाई आणि २५ हजार रुपये कायदेशीर खर्च देण्याचेही निर्देश दिले. त्यामुळे बँक खात्याचे व्यवहार नियमित तपासा आणि संशयास्पद व्यवहार दिसल्यास त्वरित बँकेशी संपर्क साधा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button