Latest

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज… अहिल्यानगरच्या कृषी संशोधन केंद्राने करून दाखवले ! सूर्यफुलाचा नवीन वाण विकसित, नव्या जातीचे वैशिष्ट्ये कसे आहेत?

प्रतिकूल परिस्थिती, निधीची कमतरता आणि जमिनीचा तुटवडा… अशा अनेक अडचणींवर मात करत अहिल्यानगरच्या कृषी संशोधन केंद्राने मोठी कामगिरी केली आहे. सावळीविहीर येथील कृषी संशोधन केंद्राने सूर्यफुलाचा ‘फुले अर्णव’ हा नवीन संकरित वाण विकसित केला आहे. विशेष म्हणजे, या वाणाला कृषी संशोधन समितीची अधिकृत मान्यताही मिळाली आहे.

या नव्या वाणाची वैशिष्ट्ये ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल! फुले अर्णवमध्ये तब्बल ३९ टक्के तेलाचे प्रमाण असून, हा वाण अवघ्या ९४ दिवसांत पक्व होतो. मोठे, गडद काळ्या रंगाचे दाणे, मोठ्या व्यासाचे फूल आणि विविध कीड व रोगांना प्रतिकार करण्याची क्षमता ही या वाणाची खास वैशिष्ट्ये आहेत.

विशेष म्हणजे, या संशोधन केंद्राची स्थापना १९१५ मध्ये झाली होती. २००४ पासून सुरू असलेल्या संकरित सूर्यफुलाच्या संशोधनाला आता मोठे यश मिळाले आहे. अधिक उत्पादन आणि तेलाचे प्रमाण यामुळे हा वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष उत्पादनासाठी योग्य लागवड आणि व्यवस्थापन महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button