
पाथर्डी तालुक्यात सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या दोन रीलस्टारवर लुटमारीचा गंभीर आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे. पाथर्डी-कोरडगाव रस्त्यावरील शेकटे फाट्याजवळ ही घटना घडलीये. नेमकं काय घडलं? सगळं सांगतो. त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी तिसगाव येथील दीपक गरुड हा गुरुवारी रात्री आई मैना गरुडसोबत दुचाकीवरून सोनोशी येथे मावशीच्या घरी जात होता. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या चौघांनी त्यांना अडवले. फिर्यादीनुसार, सोशल मीडियावरील रीलमधून दीपकने दोघांना ओळखले.
यातील एका मुलीने आईच्या पर्समधील सात हजार रुपये, मंगळसूत्र आणि सोन्याची कानातील फुले काढून घेतल्याचा आरोप आहे.
तर दुसऱ्या रीलस्टारने दीपकला मारहाण करून त्याच्या खिशातील दोन हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अन्य दोघांनी दीपकला पकडून ठेवल्याचा आरोप आहे.
यानंतर चौघेही मित्राची दुचाकी घेऊन पसार झाले. लुटलेल्या ऐवजाची एकूण किंमत ६९ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेनंतर दीपकने ११२ क्रमांकावर संपर्क साधला. पाथर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तुमच्या मते, अशा घटनांवर काय कारवाई व्हायला हवी? कमेंट करा!





