Explained

Explained : Sujay Vikhe | जे अशक्य आहे, तेच विखे करुन दाखवताहेत… चर्चा म्हणूनच वाढलीय

राहाता तालुक्यातील अस्तगाव शिवारातील शिवमहापुराण कथेची गुरुवारी सांगता झाली. ही कथी सोमवारी सुरु झाली होती. गेल्या चार दिवसांत तब्बल 12 लाखांपेक्षा जास्त भाविकांनी या कथेचा आनंद लुटला. पहिल्या व शेवटच्या दिवशी भाविकांची रिघ वाढत राहिली. गुरुवारी विक्रमी गर्दीच्या साक्षीने विखे पाटील परिवाराने पंडीत प्रदीप मिश्रांचा गौरव केला. गेल्या 30 वर्षांत एवढं मोठ नियोजन व सुव्यवस्थित यंत्रणा मी पाहिली नाही, असं म्हणत पंडीत प्रदीप मिश्रा भावूक झालेले सगळ्या जगाने पाहिले. ही शिवमहापुराण कथा नुसतीच आध्यात्मिक पर्वणी नाही तर, इतर अनेक कारणांसाठी माईलस्टोन ठरली. नगरच्या राजकीय व आध्यात्मिक क्षेत्रात नेमकं काय चाललंय? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

विखे परिवाराच्या जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात सिहोरवाल्या बाबांचा विक्रमी कार्यक्रम यशस्वी झाला. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खा. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने तो शक्य झाला. तब्बल 10-12 लाख भाविकांचे संपूर्ण पाच दिवस नियोजन करणे सोप्पे काम नव्हते. जनसेवा फाऊंडेशनचे कार्यकर्ते व प्रवरेची यंत्रणा गेल्या आठ दिवसांपासून दिवस-रात्र यासाठी राबत होती. स्वतः सुजय विखेंनी दिवसभरात तब्बल 20 तास उभं राहून, सगळं नियोजन मार्गी लावलं. नुसतं मार्गी लावलं नाही, तर अशक्य शक्य करुन दाखवलं. हे सगळं पाहिल्यावर पंडीत प्रदीप मिश्रांनी या कथेचा गौरव केला. आजपर्यंत आपण केलेल्या शिवमहापुराण कथेत सर्वात भव्य व सुनियोजित कथा, असं प्रशस्तीपत्र पंडीत प्रदीप मिश्रांनी विखे परिवाराला दिलं.

सांगता कार्यक्रमाच्या भाषणात डॉ. सुजय विखे पाटील यांच्या डोळ्यात पूर्णत्वाचा आनंद ओसंडून वाहताना दिसला. सुरुवातीला त्यांनी शिवपुराण कथेच्या नियोजनाचा आढावा घेताना सांगितले, या सोहळ्यासाठी मंडप टाकतानाही मोठ्या स्वरुपात पाऊस पडला आणि कथेच्या सांगतेला देखील पावसाने हजेरी लावली. हा परमेश्वरी योगायोग असल्याचे नमूद करून भाविकांना कोणतीही अडचण होऊ नये म्हणून सर्व स्वयंसेवक कार्यकर्ते रांत्रदिवस मेहनत घेत होते. भाविकांमध्ये जेवढा उत्साह दिसला तेवढाच जास्त उत्साह स्वयंसेवकातही दिसला. त्यामुळेच हे सगळं शक्य झालं.

सुजय विखे नेमकं काय म्हणाले ते आपण पाहू…
(विखेंचा बाईट…)


जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भाषणात सुजय विखेंच्या नियोजनाचं कौतूक केलं. ते म्हणाले, या शिवनगरीमध्ये भाविकांचा भवसागर निर्माण झाला होता. पंडितजींच्या मुखातून मागील पाच दिवस आपण सर्वांनी ऐकलेली शिवपुराण कथा ही जीवनाच्या सुखाचा एक नवा मार्ग सादर करणारी ठरली आहे. कार्तिक महिन्याच्या पावन पर्वात ऐकायला मिळालेली शिवपुराण कथा ही आपल्या सर्वांच्या आयुष्यासाठी एक नवा आयाम ठरेल. डॉ. सुजय विखे पाटील आणि त्यांच्या सर्व टीमने आव्हानात्मक परिस्थितीवर मात करून हा आध्यात्मिक यज्ञ यशस्वी केला. त्यांचे अभिनंदन. या सोहळ्याच्या यशस्वितेसाठी सर्व शासकीय विभागांनी केलेल्या सहकार्याबद्दलही विखे पाटलांनी कृतज्ञता व्यक्त केली.

या विक्रमी शिवमहापुराम कथेची वैशिष्ट्ये काय ठरली, ते थोडक्यात पाहू…

⦁ कथेसाठी सुमारे 75 एकर जागेवर मंडप टाकण्यात आला.
⦁ तीन भव्य मंडपात सुमारे लाखभर भाविकांची बैठक व्यवस्था होती.
⦁ गेल्या 5 दिवसांत 10 ते 12 लाखांपेक्षा जास्त भाविक उपस्थित होते.
⦁ रोज 40 ते 50 हजार भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था होत होती.
⦁ मुक्कामी राहणाऱ्यांसाठी नाष्टा, चहा यांचीही सुविधा होती
⦁ मुक्कामी भाविकांसाठी साईभजन व इतर धार्मिक कार्यक्रम होत होते.
⦁ प्रवरा मेडिकल ट्रस्ट व साई संस्थान हाँस्पिटलकडून वैद्यकीय सुविधा दिल्या जात होत्या.
⦁ जिल्हाभरातील पोलिस दल बंदोबस्तासाठी उपस्थित होते.
⦁ महिला बचत गटांनी 100 पेक्षा जास्त स्टाँलद्वारे आपल्या उत्पादनांची विक्री केली.
⦁ राहाता तालुक्यातील अर्थव्यवस्थेला यामुळे प्रचंड चालना मिळाली.
⦁ छोट्या-मोठ्या व्यावसायिकांची गेल्या पाच दिवसांत लाखोंची उलाढाल झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button