Latest

अहिल्यानगरच्या डॉक्टरांची रशियात चर्चा ! डॉ. प्रफुल्ल चौधरींच्या शस्त्रक्रियेचं आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कौतुक ; ग्लोबल स्टेजवर दुर्मिळ शस्त्रक्रियेचे सादरीकरण

अहिल्यानगरमध्ये केलेली दुर्मिळ शस्त्रक्रिया थेट रशियात चर्चेचा विषय ठरली… अहिल्यानगरच्या डॉक्टरांच्या कौशल्याची आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनीही घेतली दखल….

मंडळी, अहिल्यानगरच्या स्वास्तिक आय इन्स्टिट्यूटचे नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रफुल्ल चौधरी यांनी रशियातील मॉस्को येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नेत्रविज्ञान परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. २३ ते २५ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या परिषदेत त्यांनी संधिवातामुळे कॉर्नियाला छिद्र पडलेल्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या रुग्णावर केलेल्या दुर्मिळ शस्त्रक्रियेचं सादरीकरण केलं.

या शस्त्रक्रियेला ‘क्रेसेंट्रिक केराटोप्लास्टी’ असं म्हणतात. यामध्ये केळ्याच्या आकाराची अर्धचंद्राकृती कॉर्नियल प्रत्यारोपण पद्धत वापरून रुग्णाची दृष्टी वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

डॉ. चौधरींच्या या सादरीकरणाचं रशियातील नेत्रतज्ज्ञांनी विशेष कौतुक केलं. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी रुग्णांचा विश्वास, संपूर्ण टीमचं योगदान आणि अहिल्यानगरमध्ये केलेल्या वैद्यकीय कामाला जागतिक व्यासपीठ मिळाल्याचा आनंद व्यक्त केला.

स्थानिक पातळीवर केलेलं काम जेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतं, तेव्हा संपूर्ण शहरासाठी हा अभिमानाचा क्षण ठरतो असे डॉ प्रफुल्ल चौधरी यांनी बोलताना सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button