Latest

किडनी खराब होण्याआधी शरीर स्वतः देतं वॉर्निंग…; ‘या’ सहा बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका !

मंडळी, आपल्या शरीरातील किडनी रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त पाणी बाहेर काढण्याचं महत्त्वाचं काम करते. मात्र किडनीची कार्यक्षमता कमी होऊ लागली, तर सुरुवातीला कोणताही ठळक त्रास जाणवत नाही. आजार वाढल्यानंतर काही संकेत दिसू शकतात.

पहिलं म्हणजे, लघवीला वारंवार फेस येणं. किडनीच्या फिल्टरमधून प्रोटीन लघवीत जात असल्यामुळे असं होऊ शकतं.

दुसरं, तोंडाची स्वच्छता ठेवूनही श्वासाला अमोनिया किंवा लघवीसारखा वास येणं.

तिसरं, तोंडाला सतत कडू किंवा धातूसारखी चव जाणवणं.

चौथं, पुरेशी झोप घेऊनही थकवा जाणवणं. किडनीचं कार्य कमी झाल्यास अॅनिमियाचा धोका वाढू शकतो.

पाचवं, सकाळी डोळ्यांभोवती सूज येणं आणि सहावं, पाय किंवा घोट्यांना सूज येणं.

मात्र लक्षात ठेवा, ही लक्षणं दिसली म्हणजे किडनीचा आजार आहेच असं नाही. वारंवार असा त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक तपासण्या करून घ्या. कारण वेळेवर निदान झाल्यास योग्य उपचार घेणं शक्य होतं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button