
२०२४ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात अनेक संशोधनांचे विश्लेषण करण्यात आले. त्यानुसार B रक्तगट असलेल्या लोकांमध्ये टाइप-२ डायबिटीसचा धोका इतर रक्तगटांच्या तुलनेत सुमारे २८ टक्के अधिक असल्याचे दिसून आले. तर काही अभ्यासांमध्ये O रक्तगट असलेल्या व्यक्तींमध्ये हा धोका तुलनेने कमी आढळला आहे.
मात्र, याचा अर्थ B रक्तगट असेल तर डायबिटीस होणारच किंवा O रक्तगटामुळे डायबिटीस होणार नाही, असा अजिबात नाही. रक्तगट आणि डायबिटीस यांच्यातील नेमका संबंध अद्याप स्पष्ट झालेला नाही..
विशेष म्हणजे, रक्तातील साखर दीर्घकाळ वाढलेली राहिल्यास हृदय, किडनी, डोळे आणि नसांवर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे रक्तगट कोणताही असो, नियमित व्यायाम, संतुलित आहार, वजन नियंत्रण आणि वेळोवेळी रक्तातील साखरेची तपासणी करणं महत्त्वाचं आहे.





