
तुमच्या आजोबा-पणजोबांच्या नावावर कुठे जमीन होती, याची माहिती नाही? अनेक वर्षांपासून पडून असलेली पूर्वजांची जमीन तुमच्या हक्काची असू शकते! आता यासाठी तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारण्याची गरज नाही.
घरबसल्या मोबाईलवरच जमिनीची माहिती शोधता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाभूलेख पोर्टलवर जाऊन तुम्ही ७/१२ उतारा, फेरफार आणि जमिनीशी संबंधित नोंदी तपासू शकता. यासाठी सर्वप्रथम अधिकृत महाभूलेख वेबसाईट उघडा.
त्यानंतर जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. पुढे खातेदाराचे नाव, गट नंबर, सर्व्हे नंबर किंवा खाते नंबर टाकून शोध घ्या. तुमच्याकडे गट नंबर नसेल, तर आजोबा किंवा पणजोबांचे नाव टाकून शोध घेता येईल. मात्र जुन्या नोंदींमध्ये नावाचे स्पेलिंग वेगळे असू शकते.
त्यामुळे नावाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून पाहा. महत्त्वाचं म्हणजे ऑनलाइन ७/१२ हाच अंतिम मालकीचा पुरावा नाही. जमीनविषयक व्यवहार किंवा वाद असल्यास जुने खरेदीखत आणि फेरफार नोंदीही तपासा. म्हणूनच, तुमच्या पूर्वजांची जमीन शोधण्याची ही माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवा!





