Latest

स्कॉच व्हिस्कीच्या शौकिनांसाठी गुड न्यूज ! महाराष्ट्रात ‘या’ ब्रॅण्ड्सच्या किमतीत झाली मोठी घसरण, कारण काय ?

स्कॉच व्हिस्कीच्या शौकिनांसाठी मोठी बातमी आहे ! भारत आणि ब्रिटनमधील एका करारामुळे आता विदेशी दारूच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळत आहे.

भारत आणि ब्रिटन यांच्यातील फ्री ट्रेड करार लागू झाल्यानंतर आयात शुल्कात कपात करण्यात आली आहे. याचा परिणाम आता स्कॉच व्हिस्कीच्या किमतींवर दिसू लागला आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये काही प्रसिद्ध ब्रँड्सचे दर कमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, जॉनी वॉकर ब्लॅक लेबलच्या ७५० मिली बाटलीची किंमत ४ हजार २५० रुपयांवरून जवळपास ३ हजार ८०० रुपयांपर्यंत आली आहे. तर J&B ची किंमत २ हजार ३०० रुपयांवरून १ हजार ७०० रुपयांपर्यंत घसरली आहे.

या करारानुसार स्कॉचवरील आयात शुल्क १५० टक्क्यांवरून ७५ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहे. पुढील दहा वर्षांत ते ४० टक्क्यांपर्यंत आणण्याचे नियोजन आहे. मात्र, प्रत्येक राज्यात दरकपात सारखीच असेल असे नाही. कारण अंतिम किंमतीवर उत्पादन शुल्क आणि इतर खर्चांचाही परिणाम होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button