Latest

नियतीने डाव साधला…घरासमोर उभ्या असलेल्या अप्पासाहेबांवर काळाचा घाला; श्रीगोंद्यात भरधाव बुलेटच्या धडकेत मृत्यू !

घरासमोर उभ्या असलेल्या वृद्धाला भरधाव बुलेटने उडवलं अन् उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला! अपघातानंतर चालक मात्र घटनास्थळावरून पसार झाल्याने घोडेगावमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथे मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली. अप्पासाहेब लहानू देवकर उर्फ बबन देवकर हे आपल्या घरासमोर उभे असताना हिरडगाव येथील एका बुलेटचालकाने भरधाव वेगात येत त्यांना जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत देवकर यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने श्रीगोंदा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

विशेष म्हणजे, अपघातानंतर बुलेटचालक घटनास्थळावरून फरार झाला. याप्रकरणी अनिल देवकर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला असून पसार चालकाचा शोध सुरू आहे.

देव नदीच्या तीरावर सायंकाळी सात वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घरासमोर उभ्या असलेल्या वृद्धाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने देवकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button