
भाड्याच्या घराला दिवाळीपूर्वी रंग द्यायचा आहे? थांबा! पैसे देण्याआधी हा नियम नक्की जाणून घ्या! भाड्याच्या घरात राहताना रंगकामाचा खर्च नेमका कोण करणार, हा प्रश्न अनेकांना पडतो. यासाठी सर्वात आधी तुमचा भाडेकरार तपासणं महत्त्वाचं आहे.
जर करारात घर रंगवण्याची जबाबदारी भाडेकरूची असल्याचं स्पष्टपणे नमूद असेल, तर त्यानुसार खर्च भाडेकरूला करावा लागू शकतो. पण करारात रंगकामाबाबत कोणतीही अट नसेल, तर घराची नेहमीची रंगरंगोटी, व्हाईटवॉश आणि सामान्य झीज यासाठीचा खर्च घरमालकाच्या जबाबदारीत येतो.
मात्र भाडेकरूच्या निष्काळजीपणामुळे भिंती खराब झाल्या, मोठे डाग पडले किंवा ठोकाठोकीमुळे नुकसान झालं असेल, तर त्या नुकसानीची डागडुजी करण्याचा खर्च भाडेकरूला करावा लागू शकतो.
त्यामुळे सणासुदीत घर रंगवण्यापूर्वी घरमालकाशी चर्चा करा आणि भाडेकरारातील अटी नीट वाचा. फक्त घराचा जुना रंग उडाला म्हणून भाडेकरूनेच पैसे द्यायचे, असं प्रत्येक वेळी नसतं!





