Latest

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी ! १५०० रुपयांच्या हप्त्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार का ? सरकारने काय सांगितल…

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रखडलेला हप्ता मिळवण्यासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार असा दावा केला जात असून यासाठी एक लिंक देखील शेअर केली जात आहे. पण खरच रखडलेला हप्ता मिळवण्यासाठी पुन्हा अर्ज भरावा लागणार आहे का? तर मंडळी याबाबत आता सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या एक मेसेज चर्चेत आहे. ई-केवायसी अपूर्ण राहिलेल्या किंवा हप्ता बंद झालेल्या महिलांनी पुन्हा अर्ज करावा, असं या मेसेजमध्ये सांगितलं जात आहे.

यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खात्याची माहिती आणि इतर कागदपत्रे मागितली जात आहेत. मात्र, सावधान! नवीन नोंदणी प्रक्रिया सध्या बंद आहे. तसंच ई-केवायसी पुन्हा सुरू झाल्याचा व्हायरल दावा पण चुकीचा आहे.

त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नका. कारण एका चुकीच्या क्लिकमुळे तुमची बँकिंग माहिती धोक्यात येऊ शकते! माहिती नेहमी अधिकृत सरकारी माध्यमातूनच तपासा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button