Latest

गॅस सिलिंडरवर अनुदान पाहिजे ना ? मग १ ऑक्टोबरपूर्वी हे काम नक्की करा !

घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. १ ऑक्टोबरपासून अनुदानासह निर्धारित दरात घरगुती गॅस सिलिंडर बुक करण्यासाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण म्हणजेच बीएए पूर्ण असणं आवश्यक ठरणार आहे.

आधार प्रमाणीकरणामुळे गॅस जोडणी योग्य ग्राहकाच्या नावावर आहे का, याची पडताळणी करता येते. बनावट किंवा दुबार जोडण्या शोधणे आणि अनुदानाचा गैरवापर रोखणे हा यामागचा उद्देश आहे.

महत्त्वाचं म्हणजे, ज्यांनी यापूर्वीच बीएए प्रक्रिया पूर्ण केली आहे, त्यांना पुन्हा प्रमाणीकरण करण्याची गरज नाही. मात्र, ज्यांचं प्रमाणीकरण झालेलं नाही, त्यांना अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

गॅसपुरवठा मात्र पूर्णपणे बंद केला जाणार नाही; विनाअनुदान बाजारभावाने सिलिंडर घ्यावा लागू शकतो. प्रमाणीकरणासाठी तीन पर्याय आहेत—सिलिंडर डिलिव्हरीवेळी कर्मचारी, गॅस एजन्सी किंवा संबंधित कंपनीच्या अधिकृत मोबाइल अॅपद्वारे.
त्यामुळे तुमचं आधार प्रमाणीकरण झालंय का, हे आत्ताच तपासा!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button