Explained

Explained : Kopargaon Nagar Palika | काळे-कोल्हेच नाही तर, झावरे-वहाडणेही आलेत चर्चेत; पालिका निवडणूक रंगतदार होईल

कोपरगाव नगरपालिका निवडणूक यावेळी चांगलीच रंगतदार होण्याची शक्यता आहे. नगराध्यक्षपदासाठी इतर मागास वर्गाला आरक्षण मिळाल्याने यंदाची निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी किमान आपल्या राहाता तालुक्यात ओरिजिनल ओबीसी उमेदवारांनाच संधी दिली जाईल, असे सांगितले होते. तसे कोपरगावातही झाले तर निवडणुकीत रंगत येईल. ज्या काळे-कोल्हेंभोवती कोपरगावचे राजकारण फिरते त्यांच्याखेरीज झावरे, वहाडणे गटही कोपरगावात चांगलाच अँक्टीव्ह आहे. त्यामुळे यंदा पक्षापेक्षा गटांच्या भोवतीच कोपरगावचे राजकारण फिरेल, अशा शक्यता व्यक्त केल्या जात आहे. नेमकं काय होईल कापरगावला..? याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट…

कोपरगावला सहकाराच्या राजकारणाचा वारसा आहे. परंतु स्थानिक पातळीवर राजकारणात काळे-कोल्हे या दोन घराण्यांना काही स्थानिक नेत्यांच्या कडवा संघर्ष सहन करावा लागल्याचाही इतिहास आहे. राज्यात महायुती एकत्र लढणार असली तरी, जेथे शक्य नाही तेथे महायुतीतही स्पर्धा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोपरगावात काळे विरुद्ध कोल्हे या लढतीखेरीज काही स्थानिक नेत्यांच्या गटांसोबतही स्पर्धा रंगणार आहे. नगराध्यक्षपद हे ओबीसीला राखीव आहे. शहरातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेकांना त्यामुळे डोहाळे लागले आहे. कामाचा अनुभव, समाजसेवा, मतदारांशी संवाद या मुद्यावर भर दिला जात आहे. सोशल मीडियावरही अनेक इच्छुक सक्रीय झालेले दिसत आहेत.

नगराध्यक्षपदासाठी राजेंद्र झावरे, राजेंद्र सोनवणे, मंगेश पाटील, दिनार कुदळे, योगेश बागुल, पराग संधान, वैभव गिरमे, डाँ. तुषार गलांडे, सतिष काकडे, सुनील गुंगले आदी नावे चर्चेत आहेत. अर्थात ही नावे त्या-त्या परिस्थितीनुसार बदलणार आहेत. दुसरीकडे सत्ताधारी भाजपचे निष्ठावान समजल्या जाणाऱ्या विजय वहाडणे गटाचा सामना कोल्हे गटांस करावा लागेल, अशी गणितेही मांडली जात आहे. विधानसभेला माघार घ्यावी लागलेल्या, कोल्हे गटानेही महायुतीत नगराध्यक्षपदावर दावा सांगितला आहे. दुसरीकडे आ. काळे गटातही अनेक इच्छुकही माणसांत दिसू लागले आहेत. निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसे संदर्भ बदलताना दिसत आहेत.

सध्यातही भाजपकडून विजय वहाडणे, काळे गटाकडून विजय आढाव, शिवसेना ठाकरे गटाकडून विजय झावरे, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांची नावे नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. दुसरीकडे शिवसेनेकडूनच सपना मोरे याही इच्छुकांच्या यादीत सध्यातरी दिसत आहेत. काहींनी तर आरक्षण जाहीर होताच नारळ फोडून प्रचारही सुरु केलेला दिसतोय. कोपरगाव पालिका हद्दीत सध्या सर्वच इच्छुकांची भाऊगर्दी दिसत असून काहींनी आपल्या सौभाग्यवतींसाठी फिल्डींग लावलेली दिसत आहे. यावेळी कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक चांगलीच रंगतदार होईल, असे चित्र दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button