Latest

अहिल्यानगरच्या साखर कारखान्यांत गाळपाची स्पर्धा ! प्रवरानगरची ३ लाखांची मजल, कोणता कारखाना ठरला नंबर वन ?

अहिल्यानगर जिल्ह्यात साखर कारखान्यांची धुराडी पेटली असून ऊस गाळपात जोरदार चुरस रंगली आहे. कोणता कारखाना आघाडीवर आहे आणि सर्वाधिक साखर उतारा कुणाचा? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.

मंडळी, १४ नोव्हेंबरअखेरच्या आकडेवारीनुसार, सहकारी कारखान्यांमध्ये प्रवरानगरने अवघ्या ३५ दिवसांत ३ लाख ८ हजार ८५० टन उसाचं गाळप करत बाजी मारली आहे. तर ज्ञानेश्वर कारखाना दुसऱ्या आणि मुळा कारखाना तिसऱ्या क्रमांकावर आहे.

मात्र, खासगी कारखान्यांमध्ये अंबालिकेने सर्वांनाच मागे टाकलंय. अवघ्या ३० दिवसांत तब्बल ३ लाख ८२ हजार ६६५ टन उसाचं गाळप करून अंबालिकेने जिल्ह्यात सर्वाधिक गाळपाची नोंद केली आहे.

दुसरीकडे, आजच्या साखर उताऱ्यात कोळपेवाडीने १०.५५ टक्क्यांसह अव्वल स्थान पटकावलं आहे. आता या स्पर्धेत आगामी काळात कोणता कारखाना बाजी मारणार, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तर मग मंडळी तुमच्या मते जिल्ह्यातील अव्वल साखर कारखाना कोणता? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button