
कुकडीच्या पाण्यासाठी आता पाच तालुक्यांतील शेतकरी एकाच व्यासपीठावर आलेत. डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या मागणीसाठी मोठं आंदोलन उभं राहणार असून, थेट नगर-पुणे महामार्ग रोखण्याचा इशारा देण्यात आलाय. नेमकं प्रकरण काय? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळावं, यासाठी डिंभे-माणिकडोह बोगदा होणं गरजेचं असल्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जातेय. या लढ्याला दिशा देण्यासाठी श्रीगोंद्यात पाच तालुक्यांतील नेत्यांची बैठक पार पडली.
यावेळी डिंभे-माणिकडोह बोगदा निर्माण कृती समितीची स्थापना करण्यात आली असून, अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांची एकमताने निवड झाली.
करमाळा, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा आणि जुन्नर या तालुक्यांत आंदोलन केलं जाणार आहे. त्यानंतर बेलवंडी फाटा येथे नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा समितीने दिलाय.
दरम्यान, १ सप्टेंबरला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळूनही प्रकल्पाचा शासन आदेश अद्याप निघालेला नाही. बोगद्याचं काम पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय. तर मग मंडळी तुम्हाला काय वाटतं, शेतकऱ्यांच्या या लढ्याला यश मिळेल का? कमेंट करून नक्की सांगा!





