
श्रद्धा कपूर आता मराठमोळ्या लावणीच्या ठेक्यावर थिरकणार! त्यातच अजय-अतुलचं दमदार संगीत आणि श्रेया घोषालचा आवाज! नेमकी काय आहे ही खास बातमी? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
महाराष्ट्राच्या प्रसिद्ध लोककलावंत विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित ‘ईठा’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.या चित्रपटात श्रद्धा कपूर विठाबाईंची भूमिका साकारत असून, पहिल्या ‘जी जी रे जी’ गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय.
या गाण्याला अजय-अतुल यांनी संगीत दिलंय, तर श्रेया घोषाल यांनी आपल्या आवाजाची जादू दाखवलीय. अमिताभ भट्टाचार्य यांनी गीतलेखन केलंय.पारंपरिक लावणीचा साज, घुंगरांचा निनाद आणि श्रद्धाच्या नृत्याची झलक प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे.
या गाण्याचा संपूर्ण व्हिडीओ १७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि सिद्धार्थ जाधवदेखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.चित्रपट ४ डिसेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत दाखल होणार आहे. तर मग मंडळी, तुम्ही हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहात का? कमेंट करून नक्की सांगा.





