
नोव्हेंबरचा तिसरा आठवडा मनोरंजनप्रेमींसाठी खास असणार आहे. कारण या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत. यात कॉमेडी, रोमँटिक, क्राईम आणि थ्रिलर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कथा पाहायला मिळणार आहेत. चला तर मग, जाणून घेऊया संपूर्ण यादी! पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, भुवन बामची लोकप्रिय मालिका ‘धिंडोरा २’ २० नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर येणार आहे. तर ‘कॅम्पस डायरीज सीझन २’ ही मालिका १८ नोव्हेंबरपासून Amazon MX Player वर पाहता येईल.
‘मिस्टर अँड मिसेस ऑफिस’ ही कॉमेडी मालिका १८ नोव्हेंबरला जिओहॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ‘अनबिल अवन’ हा तमिळ चित्रपट २० नोव्हेंबरला SonyLIV वर, तर ‘परफेक्ट लायर्स’ २० नोव्हेंबरला प्राईम व्हिडीओवर येणार आहे.
‘द ब्लू रोड’ ही क्राईम थ्रिलर मालिका २० नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर, तर निकोलस केजचा ‘मॅडेन’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. म्हणजेच या आठवड्यात घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. तर मग मंडळी, तुम्ही यापैकी कोणती सीरिज किंवा चित्रपट पाहणार आहात? कमेंट करून नक्की सांगा.





