
रामायण चित्रपट पाहायला गेलेल्या काही प्रेक्षकांना रामापेक्षा रावणाचं व्यक्तिमत्त्व अधिक भावलं! पण खलनायक असूनही रावणाचं पात्र आकर्षक का वाटतं? यामागे मानसशास्त्र काय सांगतं? सांगतो. आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
सोशल मीडियावर रामायणातील राम आणि रावणाच्या व्यक्तिमत्त्वाची जोरदार चर्चा सुरू आहे. रामाचं शांत, संयमी आणि साधं व्यक्तिमत्त्व आदर्श पुरुषाची प्रतिमा दाखवतं. तर रावणाची भारदस्त शरीरयष्टी, दाट दाढी, गंभीर आवाज आणि प्रभावी देहबोली प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते.
मानसशास्त्रानुसार, आत्मविश्वास, प्रभावी आवाज आणि शरीरयष्टी यांसारख्या गोष्टी काही लोकांना आकर्षक वाटू शकतात.विशेष म्हणजे, सोशल मीडियावरील लाईक्स आणि कौतुकामुळे बाह्य व्यक्तिमत्त्वाला अधिक महत्त्व मिळताना दिसतं.
मात्र, आकर्षक दिसणं आणि चांगला स्वभाव असणं या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.खऱ्या आयुष्यात विश्वास, संवेदनशीलता आणि भावनिक समजूतदारपणा अधिक महत्त्वाचा ठरतो. प्रत्येकाची आकर्षणाची व्याख्याही वेगळी असते. तर मग मंडळी, तुम्हाला रामायणातील कोणतं पात्र आवडलं? कमेंटमध्ये नक्की सांगा.





