Latest

पंचायतच्या चाहत्यांना मोठा धक्का ! पाचवा सीझन पुन्हा लांबणीवर, कधी रिलीज होणार पंचायत?

पंचायतच्या चाहत्यांनो, सचिवजी आणि फुलेरा गावाची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक निराशाजनक बातमी आहे ! नेमक काय घडलंय? सांगतो. पण आधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.

मंडळी पंचायतचा पाचवा सीझन २०२६ मध्येही प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाहीये. खुद्द प्राइम व्हिडिओने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत यावर शिक्कामोर्तब केलंय.

या पोस्टमध्ये बनराकसच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता दुर्गेश कुमार हात जोडून उभा आहे. त्यासोबत कॅप्शन दिलंय, ‘बताते हुए खेद है, पंचायत का अगला सीजन कैद है.’ म्हणजेच फुलेरा गावात परतण्यासाठी चाहत्यांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

मात्र, पाचव्या सीझनमध्ये गावातील राजकीय सत्तांतराची रंगत पाहायला मिळू शकते. क्रांती देवी सरपंच झाल्यानंतर बनराकसचा वाढलेला प्रभाव, प्रधानजींचा पराभव आणि सचिवजींच्या आयुष्यातील नवे प्रश्न कथेला वेगळं वळण देणार आहेत.

त्यातच अभिषेकचं एमबीए करण्याचं स्वप्न आणि रिंकीसोबतचं नातंही महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, नवीन रिलीज डेट अद्याप जाहीर झालेली नाही. तर मग मंडळी, तुम्हाला पंचायतचा पाचवा सीझन किती उत्सुकतेने वाट पाहायला लावतोय? कमेंट करून सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button