
अहिल्यानगरकरांसाठी मोठी बातमी आहे ! शहरातील खड्डे आणि खराब रस्त्यांच्या समस्येपासून सुटका होण्याची शक्यता आहे. कारण शहरातील तब्बल ४२ रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ४८८ कोटी ६३ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय. या योजनेत कोणते रस्ते आहेत? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून महापालिका प्रशासनाने हा प्रस्ताव तयार केला असून, महासभेने त्याला मंजुरी दिली आहे. आता शासनाच्या अंतिम मंजुरीची प्रतीक्षा आहे.
यामध्ये श्रीराम चौक ते संघर्ष चौक, तोफखाना पोलीस ठाणे ते भिस्तबाग चौक, नेप्ती नाका ते आयुर्वेद चौक ते सक्कर चौक, पुणे रोड ते कायनेटिक चौक, प्रेमदान चौक ते प्रोफेसर चौक आणि दिल्ली गेट ते सबजेल चौक या रस्त्यांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, केवळ काँक्रिटीकरण नाही, तर पावसाळी गटारी, विद्युत खांबांचे स्थलांतर, रस्ता दुभाजक आणि वृक्षलागवडही केली जाणार आहे.
आता शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर या कामांना सुरुवात होणार आहे. तर मग मंडळी तुम्हाला काय वाटतं शहरातील कोणते रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजेत? कमेंट करून नक्की सांगा.





