
क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! चेन्नई सुपर किंग्सचा लाडका महेंद्रसिंग धोनी आता IPL मध्ये खेळाडू म्हणून मैदानावर दिसणार नाही. त्याने IPL मधून निवृत्ती घेतली असून आता संघाची मेंटर म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. मंडळी, ही बातमी तुम्ही पाहताय, पण त्याआधी क्रीडा विश्वातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्यांसाठी AhilyanagarLive24 ला फॉलो करायला विसरू नका!
चेन्नई सुपर किंग्सने १७ नोव्हेंबर रोजी अधिकृत घोषणा करत IPL २०२७ पासून धोनी टीम मेंटर म्हणून काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धोनीने आपल्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सला तब्बल पाच वेळा IPL चे विजेतेपद मिळवून दिले.
२००८ पासून चेन्नई संघाशी जोडलेल्या धोनीने आपल्या नेतृत्वाने आणि खेळाने कोट्यवधी चाहत्यांची मने जिंकली. आता खेळाडू म्हणून त्याची इनिंग संपली असली, तरी त्याचा अनुभव नव्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी उपयोगी पडणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सनेही धोनीसोबतचे नाते कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मंडळी, धोनीला मैदानावर खेळताना पाहण्याची तुम्हाला आठवण येणार का? की मेंटर म्हणून त्याची नवी भूमिका पाहायला उत्सुक आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा!





