
अहिल्यानगर शहरात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे! पण नेमकं काय घडलंय, सविस्तर सांगतो. त्याआधी अहिल्यानगरमधील अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी AhilyanagarLive24 ला फॉलो करायला विसरू नका!
महापालिकेलगत असलेल्या CQAV परिसरात वनविभागाच्या ड्रोन कॅमेऱ्यात बिबट्याच्या हालचाली पुन्हा एकदा कैद झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर रामकृष्ण कॉलनी, पंकज कॉलनी, गंगा उद्यान चौक, सिव्हिल हडको, प्रकाशपूर आणि तारकपूर सिंधी कॉलनी परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी. बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याला पळवून लावण्याचा प्रयत्न करू नये.
तातडीने वनविभागाला माहिती द्यावी. मंडळी, शहरातील वाढता बिबट्याचा वावर पाहता नागरिकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने आणखी कोणती पावले उचलायला हवीत? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा





