
शिर्डीमध्ये आता ताज समूहाचं पंचतारांकित हॉटेल उभारलं जाणार आहे! पण या प्रकल्पामुळे शिर्डीला नेमका काय फायदा होणार आहे, सविस्तर सांगतो. त्याआधी अहिल्यानगर जिल्ह्यातील अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी AhilyanagarLive24 ला फॉलो करायला विसरू नका !
शिर्डी विमानतळ परिसरात पंचतारांकित हॉटेल उभारण्यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी आणि ताज समूहाच्या इंडियन हॉटेल्स कंपनी यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.
या हॉटेलमुळे विमानाने शिर्डीत येणाऱ्या प्रवाशांसह देश-विदेशातून येणाऱ्या साईभक्तांना दर्जेदार निवास आणि आदरातिथ्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पामुळे शिर्डीच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला आणि रोजगारनिर्मितीला हातभार लागेल, असा विश्वास व्यक्त केला.
यासोबतच शिर्डी विमानतळाच्या विकासकामांना गती देण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मंडळी, शिर्डीत ताज समूहाचं पंचतारांकित हॉटेल उभारल्यामुळे पर्यटनाला किती फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा!





