Latest

अहिल्यानगर महापालिकेत QR कोड घोटाळ्याचा आरोप ! नगरसेवकांनीच सांगितलं…

अहिल्यानगर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत QR कोडच्या वापरावरून नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरलं. घरोघरी QR कोड बसवले, मात्र स्वच्छता कर्मचारी त्याचा वापर करत नसतील तर ते बसवले कशासाठी? असा सवाल करत मोठ्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला.

दुसरीकडे, शहरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्नही चांगलाच गाजला. कुत्रे पकडण्याबाबत वारंवार सांगूनही कारवाई होत नसल्याने नगरसेवकांनी आरोग्य विभागाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर चार हजार रुपयांचा दंड आकारण्याचे स्पष्ट निर्देश सभापती सुभाष लोंढे यांनी दिले आहेत.

मंडळी, अहिल्यानगर महापालिकेच्या कारभाराबाबत तुमचं काय मत आहे? QR कोडपासून मोकाट कुत्र्यांपर्यंतच्या या प्रश्नांवर प्रशासनाने काय करायला हवं? कमेंटमध्ये नक्की सांगा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button