
श्रीगोंदा तालुक्यात यंदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा, यासाठी मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, सात साखर कारखान्यांचे गाळप सुरू असूनही अद्याप ऊसदराचा निर्णय झालेला नाही.पुढील माहिती सांगण्यापूर्वी, अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक महत्त्वाच्या बातमीसाठी AhilyanagarLive24 ला फॉलो नक्की करा!
श्रीगोंदा तालुक्यात सध्या सुमारे १२ ते १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. नागवडे, गौरी शुगर, निराणी ग्रुप, अंबालिका, दौंड शुगर आणि भीमाशंकरसह सात कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. यंदा पावसाअभावी उसाचे उत्पादन कमी झाले आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना पहिली उचल किमान ३ हजार ५०० ते ४ हजार रुपये मिळावी, अशी अपेक्षा आहे.मात्र, कारखान्यांकडून अद्याप ठोस भाव जाहीर झालेला नाही. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.
या प्रश्नावर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कारखाना प्रतिनिधी आणि शेतकरी संघटनांची बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.मंडळी, शेतकऱ्यांना उसाचा पहिला हप्ता ४ हजार रुपये मिळायला हवा का? तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा!



