Latest

उसाची शेती आता परवडेना ! एका एकराच्या पिकासाठी करावा लागतोय इतका खर्च ! उसाचे गणित नेमक कसं आहे?

एकेकाळी शेतकऱ्यांसाठी नगदी पीक म्हणून ओळखला जाणारा ऊस आता शेतकऱ्यांना आर्थिक संकटात टाकतोय. कारण उसाच्या शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढतोय, मात्र उत्पादन आणि उत्पन्न घटत चाललंय. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

नेमकं गणित काय आहे? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा. मंडळी, ऊस लागवडीपासून तोडणीपर्यंत एकरी ७० ते ७५ हजार रुपये खर्च येतो. यात मशागत, बेणे, खते, औषधं आणि ठिबक सिंचनाचा खर्च समाविष्ट आहे.

विशेष म्हणजे, खतांच्या ५० किलोच्या गोणीसाठी २ हजार ते २ हजार २०० रुपये मोजावे लागत आहेत. तर ठिबक सिंचनावर एकरी २० ते २५ हजार रुपये खर्च होतोय.

दुसरीकडे उसाच्या उत्पादनात तब्बल २० टक्क्यांची घट झाली आहे. सुरू उसातून एकरी २५ ते ३५ टन, तर आडसाली उसातून ४० ते ४५ टन उत्पादन मिळतं.

दुष्काळ, भारनियमन आणि वाढता खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. आता उसाला योग्य भाव मिळणार का, हा मोठा प्रश्न आहे! तर मग मंडळी तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button