
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कांद्याचे भाव पुन्हा एकदा चांगलेच वधारले असून नगरमध्ये कांद्याला तब्बल ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळालाय. नेमकं बाजारभावाचं चित्र काय आहे? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, मंगळवारी राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या १ हजार ५८७ गोण्यांची आवक झाली. यामध्ये नंबर एकच्या कांद्याला ४ हजार ते ५ हजार २०० रुपये भाव मिळाला.
तर नंबर दोनच्या कांद्याला २ हजार ५०० ते ३ हजार ९५० रुपये, नंबर तीनच्या कांद्याला १ हजार ते २ हजार ४५० रुपये भाव मिळाला.विशेष म्हणजे गोल्टी कांद्यालाही १ हजार ५०० ते ४ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.
त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्या आहेत. आता पुढील दिवसांत कांद्याचे भाव आणखी वाढणार की कमी होणार, याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तर मग मंडळी तुमच्या भागात कांद्याला किती भाव मिळतोय? कमेंट करून नक्की सांगा!





