Latest

40 वर्ष भाजप मग शिंदेसेना आणि आता पुन्हा भाजपमध्ये ! मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत चित्तेंची घरवापसी; पक्षप्रवेशामागचं गणित काय ?

श्रीरामपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. एकेकाळी भाजपमध्ये तब्बल ३५ ते ४० वर्षे काम केलेल्या प्रकाश चित्ते यांनी पुन्हा एकदा भाजपचा झेंडा हाती घेतलाय. विशेष म्हणजे, त्यांच्या या घरवापसीवेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही उपस्थित होते.

नेमकं या पक्षप्रवेशामागचं राजकीय गणित काय? सांगतो; पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा. मंडळी, भाजपमध्ये अनेक वर्षे काम केल्यानंतर २०२५ मध्ये प्रकाश चित्ते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता.

मात्र, वर्षभराच्या आतच त्यांनी पुन्हा भाजपमध्ये परतण्याचा निर्णय घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला.

विशेष म्हणजे, चित्ते आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात पूर्वी राजकीय मतभेद असल्याची चर्चा होती. पण आता या प्रवेशामुळे भाजपमध्ये चित्तेंना कोणती जबाबदारी मिळणार ? याकडे श्रीरामपूरचं लक्ष लागलंय! पण तुमचं याबद्दल काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button