
वयाचा विचार नाही, अंतराची भीती नाही आणि थांबण्याचा तर प्रश्नच नाही! अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोल्याच्या नऊ सायकलस्वारांनी अशीच जिद्द दाखवत गुजरातमधील स्टॅच्यू ऑफ युनिटी गाठलंय. अवघ्या तीन दिवसांत ४१० किलोमीटरचा प्रवास त्यांनी कसा पूर्ण केला? सांगतो, पण त्याआधी अहिल्यानगर लाईव्ह 24 ला नक्की फॉलो करा.
मंडळी, मॉर्निंग ग्रुप संचलित अगस्ती सायकल क्लबच्या या मोहिमेला १२ नोव्हेंबर रोजी अकोले बसस्थानकातून सुरुवात झाली. पहिला मुक्काम सापुतारा, तर दुसरा मुक्काम मांडवी येथे होता. त्यानंतर तिसऱ्या दिवशी सर्वांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी गाठलं.
या मोहिमेत राजेंद्र पुंड, रमेश पुंडे, अरुण भालेराव, किरण मालुंजकर यांच्यासह नऊ सायकलस्वार सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, आता पुढील वर्षी अयोध्येपर्यंत सायकलने जाण्याचा विचारही राजेंद्र पुंड यांनी व्यक्त केला आहे.
आरोग्य, पर्यावरण आणि इंधन बचतीचा संदेश देणाऱ्या या सायकलस्वारांचं सर्वत्र कौतुक होतंय ! तर मग मंडळी, तुम्हाला या सायकलस्वारांचं हे धाडस कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा.





