
दुष्काळी परिस्थिती, पावसाची दडी आणि उसाचे घटलेले उत्पादन… तरीही विखे पाटील साखर कारखान्याने गाळपात विक्रम केलाय ! काय आहे हा नवा विक्रम? सांगतो. पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
मंडळी, प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याने अवघ्या ३४ दिवसांत तब्बल ३ लाख १०० मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी ही माहिती दिली.
विशेष म्हणजे, कारखान्याच्या ७५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ११ ऑक्टोबरला गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑक्टोबर महिन्यातच पावणेदोन लाख टन उसाचे गाळप करण्यात आले.
यंदा पावसाने पाठ फिरवल्याने उसाचे एकरी उत्पादन घटले असतानाही शेतकऱ्यांचा ऊस गाळप करण्याला प्राधान्य देण्यात आले. इतकंच नाही, तर उसातील साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी डिजिटल ब्रिक्स मीटरचा वापरही सुरू करण्यात आला आहे.
या विक्रमी कामगिरीमुळे विखे कारखान्याची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. तर मग मंडळी तुम्हाला कारखान्याच्या या यशाबद्दल काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.





