
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनो, तुमच्याकडे नवीन लाल कांदा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण अहिल्यानगर जिल्ह्यात नवीन लाल कांद्याला तब्बल ६० रुपये किलोपर्यंत भाव मिळालाय. चला तर जाणून घेऊयात जिल्ह्यातील सविस्तर बाजारभाव! पण त्याआधी अहिल्यानगरलाईव्ह 24 ला फॉलो नक्की करा.
नेवासा तालुक्यातील घोडेगाव उपबाजारात १४ नोव्हेंबर रोजी नवीन लाल कांद्याच्या एका अर्ध्या लॉटला ६० रुपये, तर जुन्या गावरान कांद्याला ५० रुपये किलोचा कमाल भाव मिळाला. दिवाळीनंतर बाजार सुरू झाल्याने एकूण १५ हजार ८७० गोण्यांची आवक झाली. यामध्ये नवीन लाल कांद्याच्या ८ हजार २६५ गोण्यांचा समावेश होता.
कृषी पणन मंडळाच्या आकडेवारीनुसार, अहिल्यानगरमध्ये लाल कांद्याला ५ हजार ५०० रुपये, राहुरी-वांबोरीत ५ हजार, तर जामखेडमध्ये ५ हजार ५०० रुपये क्विंटलचा कमाल भाव मिळाला. शेवगावमध्ये पहिल्या दर्जाच्या कांद्याला ५ हजार ५०० रुपये भाव मिळाला.
नवीन लाल कांद्याला निर्यातीची मागणी वाढल्याने दर टिकून असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. तर मग मंडळी तुमच्या भागात कांद्याला किती भाव मिळतोय? कमेंटमध्ये नक्की सांगा!





